ब्लॉग स्पेस

आयबीएन-7 आणि आयबीएन-लोकमतच्या कार्यालयावर हल्ला झाल्यानंतर प्रेक्षक आणि हितचिंतकांचे एसएमएस, ईमेल्स यांचा ओघ सुरू झाला. सगळ्यांनीच आयबीएन लोकमत टीम आणि प्रेस यांच्याबद्दल कळकळ दाखवली. आयबीएनचा ब्रँड हा निर्भीड पत्रकारितेचं द्योतक आहे. आणि हा नीडरडता हल्ला करणा-यांसाठी त्यांनी कधी सोडू नये. काही प्रेक्षकांना वाटत होतं की शिवसेना आणि मनसेला यामुळे नाहक प्रसिद्धी मिळतेय. शिवसेनेची मोठी इमेज तयार होतेय.
इतक्या सगळ्या मेसेजिसमध्ये मला एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे कुणीही पोलिसांनी (न) बजावलेल्या भूमिकेबद्दल काहीही म्हटलेलं नाही. लोक म्हणतात, शिवसेना गुंडगिरी करतेय, कुणी म्हणालं मीडियाच उगाच भडकपणा करते. काही म्हणाले समाज हा अलिप्त असतो. पण पोलीस कुठे होते, हा प्रश्न कुणी विचारला नाही. पोलिसांनी तत्परता का दाखवली नाही? मुंबईसारख्या शहरात- एन्काउंटरसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात, पोलिसांची भीती उरलीच नाही का?
आयबीएन आणि शिवसेना हे एक निमित्त आहे. पण 21व्या शतकातल्या लोकशाहीत, बदलत्या अर्थकारणात कायद्याचं पालन होईल, असं काही नाही. कायद्याची भीती नाही. राजकीय गुंडांशी सामना करताना पोलीस असहाय्य आणि शक्तिहीनआहेत. शासनाच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या असमर्थतेमुळे आपल्या नेहमीच्या आयुष्यावर नक्कीच परिणाम होत असतो. आणि शासन वेळीच जागं झालं नाही तर हे होईलच.
आयबीएनवरचा हल्ला थोड्या वेळ बाजूला ठेवू या. पण सध्या शहरात आणि गावात रुजत चाललेला सामाजिक ट्रेंड पाहूया. अति श्रीमंत, कायद्याचं पालन न करणारा एक वर्ग आहे. या वर्गाचे स्वत:चे सुरक्षारक्षक असतात. आणि हा वर्गाचं समाजामध्ये प्रचंड प्रमाणात आधिपत्य वाढतंय. स्वतंत्र भारतात, जागतिकीकरण होत असताना हा वर्ग प्रबळ होतोय. या लोकांची बेटं तयार होतायत. मनु शर्मा आणि विकास यादव हे हिमनगाचं टोक म्हणता येईल. या गुन्हेगारांकडे त्यांच्या स्वत:च्या कार्स आहेत, हत्यारं आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या वडिलांची कनेक्शन्स आहेत. भारत त्यांच्यासाठी एक खेळाचं मैदान आहे. जिथे ते कसेही वागत सुटलेत. असं काही करतात ज्याला समाज विघातक कारवाया म्हटलं जातं.
पण श्रीमंत बापाची ही मुलं आपल्या बीएमडब्लूतून फिरत असतात. लोकशाही भारतात यांना कायद्याची काय चिंता? आयबीएनवरच्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार संजय राऊतला पोलिसांची भीती कशाला हवी? त्याचा भाऊ लोकसभेत खासदार नाही का? मग त्याला कायद्याची काय पर्वा? जेसिका लालवर गोळी झाडताना मनु शर्मा अजिबातच कचरला नाही. कारण त्याच्या वडिलांचे राजकीय संबंध आणि आपल्या विरोधात काहीच घडणार नाही याची त्याला वाटणारी खात्री !
बिघडलेली पोरं आता मोठी झालीयत. त्यातल्या ब-याच जणांचे पालक कष्टाळू होते. त्यांना सामाजिक जाणिवा होत्या..या मुलांना कशाशी देणंघेणं नाही.लोकशाहीची कुठलीच जबाबदारी त्यांच्यावर नाही.त्यांना वाटतं तेच सर्वेसर्वा आहेत. कायदा त्यांना हात लावू शकत नाही. . त्यांना नव्या भारताचा परिचय आहे. स्टार्सच्या मुलांना वाटतं स्टार बनणं हा त्यांचा अधिकारच आहे. राजकारण्यांच्या मुलांना वाटतं, ते कोणावरही अधिकार गाजवू शकतात. आपण करू ती पूर्व दिशा. ते स्वत:ला कायद्याच्या वर मानतात.
राजकीय गुंडगिरीचा शिवसेना ब्रॅण्ड जरासा निराळा आहे. अनेक दशकं शिवसेना हल्ले करतेय आणि मुंबईल दहशतीखाली ठेवतेय. याचं कारण पोलिसांची भीती त्यांना उरलेली नाही. आणि हीच निर्भयता अनेक श्रीमंत आणि सामर्थ्यवान श्रीमंतांमध्ये जाणवते. विशेषत: दिल्लीमध्ये साधं पार्किंग मिळत नसलं, तर बंदुका काढल्या जातात. ऑफिसमधून परत येत असताना तरूण मुलीला गोळी मारली जाते. बिघडलेली श्रीमंत मुलं स्वत:चे सुरक्षा रक्षक घेऊन पॉश कारमधून फिरत असतात , नाइटक्लब्जमध्ये मिरवत असतात. आणि याचं एकमेव कारण म्हणजे पोलिसांची भीती नाही.
कायदा कमकुवत झालाय. एक तर तो दुर्लक्षिला जातो किंवा लादला जातो. कायद्याच्या राज्यासाठी हा सारा आटापिटा करावा लागतोय. तुरुंगातली मारझोड, एन्कांउटर हा एक भाग झाला. आणि तो ठराविक सामाजिक वर्गात दिसतो. पण श्रीमंतांना पकडण्याची वेळ येते, तेव्हा पोलीस हवालदिल होतात. किंवा त्यांना पकडणं म्हणजे खूप प्रसिद्धी मिळवणं असं समीकरण झालंय.यामुळेच पोलिसांना कुणी गंभीरपणे घेत नाही.
तरीही भारताचं पोलीस दल निष्णात आहे. त्याचं श्रेय पोलीस दलातल्या काही स्त्री-पुरुषांना जातं. त्यांनी दलाचं नाव थोडंंफार उंचावलंय. पण आजही कनेक्शन, पैसा यामुळे काही गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यात सापडू शकत नाहीत.. येत्या आठवड्यात मनमोहन सिंग जेव्हा ओबामाला भेटतील, तेव्हा कदाचित या परिस्थितीबद्दल सांगतील. कोट्यवधी लोकसंख्या असलेल्या या देशात पोलिसांचं अस्तित्वच जाणवत नाही, हे कळल्यावर आश्चर्यच वाटेल. आपण आपापसातले मतभेद विसरून मोकळं, खेळीमेळीचं वातावरण प्रस्थापित केलं पाहिजे. आताच्या वातावरणात तसं करणं हे खरोखर आव्हान आहे.
निखिल वागळे आणि कुमार केतकर हे मला माहीत असलेले निर्भय पत्रकार. ठाम असणारे, कधीही कसली तडजोड न करणारे. नीडर आणि आदर्शवादी पत्रकारांच्या पिढीचं ते प्रातिनिधित्व करतात. मग शिवसेनेनं त्यांच्यावर वारंवार हल्ला केला तर आश्चर्य वाटायला नको.. गुडगुडी पत्रकारिता करणा-यांवर शिवसेना कशाला हल्ला करेल? केतकर आणि वागळेंचा अभिमान प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला असला तर त्यात नवल ते काय! केतकरांच्या घरावर दगडफेक झाली, वागळेही अनेकदा जखमी झालेत. तरीही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण होईल असा कायदा नाही.
शिवसेनेच्या हल्लाबद्दल जितके इ मेल्स आले, ते काळजी करणारे होते. पण एकही मेसेज पोलीस, कायद्याचं उल्लंघन याबद्दल नव्हता. इतक्या मेसेजेसमध्ये एक शब्द हरवलेला होता, तो म्हणजे पोलीस...
Posted by Ashish Parab
This is not the first time Media has been attacked by these anti-democracy minded people,but what strong actions has been taken ? these people take the law in their hands ,
Posted by Dipak Patil
आहो मॅडम हे सगळा बरोबर आहे. पण पत्रकारांनी देखील योग्य पद्धतीने वगळा पाहिजे. वागलेनची पत्रकारिता निष्पक्ष नाहीय. ते फक्ता स्वताच बोलतात. दुसर्यच ऐकतच नाही. त्यांची भाषा अरेरविची असते. ते सेना भाजप चा काठ धरतात. हिंदी मीडीया ही हिंदी लोकांच्याच बाजूने बोलतो. म्हणजे तुम्हाला जे योग्या वाटता तेच बरोबर आहे असाच सगळ्या जनतेने समजायचा का? तुम्ही सत्य जाणून घ्यायला तयारच नाहीत. तुम्ही फक्त तुमची म्हणणी मानून घेण्यासाठी पाहुण्याना बोलावतात. तुम्हाला लोकांच्या भावनांशी काही देन घेन नाही.
Posted by amey
Unfortunately or fortunately today you realise what government is doing nothing after ibnlokmat has been victimised, it is not doing anything for past 10 years.
|
1
| . | 2 | . |




