होम  »  ब्लॉग स्पेस

ब्लॉग स्पेस

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय : एक फँटसी
Apr 13, 2009
मी शिवाजीराजे भोसले बोलतोय : एक फँटसी
Posted by सोनाली देशपांडे | {14} कॉमेन्ट्स

मी शिवाजीराजे भोसले बोलतोयचा गाजावाजा भरपूर झाला. या सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करण्याचं काम प्रसिद्धी तंत्रानं चांगलं केलं. मराठी माणसाच्या मनातला शिवाजीचा वीकपॉइंट महेश मांजरेकरनं अचूक हेरला. त्याचा परिणाम आजही हा सिनेमा हाऊसफुल्ल जातोय.

मराठीतला हा बिग बजेट सिनेमा. त्याच्यावर केलेला खर्च हा सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममधून जाणवतो. दिनकर भोसले या परिस्थितीनं पिचलेल्या सर्वसामान्य माणसाला साक्षात शिवाजी महाराज भेटतात आणि त्याचं आयुष्यच बदलून जातं. मुख्य म्हणजे त्याच्यात एक आत्मविश्वास निर्माण होतो.त्या जोरावर तो बर्‍याच गोष्टींचा सामना करतो.आयुष्यतल्या अनेक वंचित गोष्टी त्याला मिळू लागतात. सिनेमाची ही वन लाइन खरोखर आकर्षक आहे. पण हा सिनेमा बघताना अनेक प्रश्न पडू लागतात.

शिवाजी भेटेपर्यंत दिनकर भोसलेला सगळं जग हडतुड करतंय. बाजारात मासे विकणार्‍या कोळीणीपासून ते बॉसपर्यंत.. दिनकर भोसले बँकेत क्लार्क आहे. म्हणजे किमान आर्थिक परिस्थिती असलेला हा इसम.. मग अनेक गोष्टी विकत घेणं त्याला कधीच परवडू शकत नाही, हे कसं काय पटू शकणार? पुन्हा आपण मराठी आहोत, म्हणून एवढा शाब्दिक अपमान खरोखरच कुणी केलेला असतो? तोही इतक्या सातत्यानं? सिनेमात मराठी माणसाचा अपमान अमराठीच करतायत. अनेकदा मराठी माणसाचा अपमान मराठी माणूसही करत असतो. पण तसं काही सिनेमात जाणवत नाही..

मी शिवाजीराजे...एक फँटसी आहे. म्हणजे दिनकरला शिवाजी भेटणं इतकीच फँटसी असती तर ठीक. पण नंतरच्या त्याच्या सर्व ऍक्शनच फँटसीत गणल्या जाऊ शकतात. नुसते दोन बोल सुनावल्यानंतर एका दिग्दर्शकाचं मतपरिवर्तन होतं. आणि मराठी म्हणून नाकारलेल्या भोसलेच्या मुलीला तो सिनेमात घेतो.पालिकेच्या एका अधिकार्‍याला पैसे खाण्यापासून परावृत्त करतो. इतकंच काय तर एका नामी गुंडाचंही ह्रदयपरिवर्तन होतं. दिनकर भोसले बिल्डरशीही मारामारी करू शकतो. या सर्व अतार्किक घटना जसजशा घडत जातात, तसतशा प्रेक्षकांच्या टाळ्या पडतात. कारण प्रेक्षकांना हवा असतो एक सुपरहिरो.आणि महेश मांजरेकरचा दिनकर भोसले ते देतो. पण तिथेच सामान्य माणसाची कथा संपून जाते.

सिनेमात एक वाक्य सारखं उच्चारलं जातं, गर्वानं म्हणा मी महाराष्ट्रीय आहे. गर्वाच्या ठिकाणी अभिमान हा शब्द हवा होता. कारण गर्वामध्ये दुसर्‍याबद्दल तुच्छता असते, जी अभिमानमध्ये नाही. अभिमानात स्वाभिमान दडलेला असतो. आणि मराठी माणसाला तेच हवंय.

सिनेमात सर्वत कलाकारांची कामं चांगली झालीयत. पण फँटसीतला शिवाजी थोडा तरुण शोभला असता. मी शिवाजीराजे भोसले बोलतोयची तुलना मुन्नाभाईशी केली जाते. तिथे गांधीजी होते, इथे शिवाजी. पण दोन्ही सिनेमे वेगळ्या धाटणीचे आहेत. मुन्नाभाई हसवून जातो. मी शिवाजीराजे..ची भव्यता नक्कीच वाखाणण्यासारखी आहे. परप्रांतीय लोकांची उणी दुणी न काढणं, त्यांच्या कष्टाचं कौतुक करणं हीदेखील जमेची बाजू. शिवाजीराजे...मधली ही एक महत्त्वाची गोष्ट प्रेक्षक लक्षात ठेवतील?

प्रतिक्रिया

Posted by KALYANI

ABHIMANA PEKSHA GARV HACH SHABD UTKRUSHTH WATATO. DUSRE LOG SWATA WAR GARV KARTAT MAG MARATHI MANSANECH KA MAGE RAHAWE????????

Posted by rohankeluskar

मुळात मराठी माणसावर एवढा अन्याय होतो का? Mahesh manjrekar has cashed in on a dirty political issue. It is a good commercial movie though.

Posted by dinesh bramhane

खूप दिवसानी इतका छान चित्रपट बघायला मिळाला याचा मनस्वी आनंद झाला

1
. 2 . 3 . 4 .

आजचे कार्यक्रम

आजचा सर्व्हे

महिला विधेयकाला होणारा विरोध योग्य आहे का?
होय
नाही
मत [ निकाल पहा ]