ब्लॉग स्पेस

महाबळेश्वरमध्ये मागच्याच आठवड्यात स्ट्रॉबेरी फेस्टिव्हल साजरा केला गेला. गेली चार वर्षे मॅप्रो आणि दिल्ली स्ट्रॉबेरी ग्रोअर्स असोसिएशन मिळून हा फेस्टिव्हल आयोजित केला जातो. गुडफ्रायडेच्या शुक्रवारपासून हा फेस्टिव्हल सुरू होतो.
शुक्रवार, शनिवार, रविवार अशी लागून सुट्टी असल्याने बरेच पर्यटक महाबळेश्वरमध्ये येतात. या वर्षी मी या फेस्टिव्हलच्या निमित्ताने महाबळेश्वरला गेले. तशी महाबळेश्वरला मी फिरण्यासाठी बर्याचदा गेलेय. पण रिपोटीर्ंग करण्याची ही माझी पहिलीच वेळ. त्यामुळेबरीच तयारी करून गेले होते. या फेस्टिव्हलचे मुख्य आर्कषण म्हणजे शेतात जाऊन स्ट्रॉबेरी खाणं आणि तेही मोफत...!
माझ्या रविवारची सुरुवातच स्ट्रॉबेरीच्या टेस्टिंगने झाली . सूर्य डोक्यावर येण्याआधी मला शूट पूर्ण करायचं होतं. म्हणून मी आणि माझा व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश आम्ही दोघंानी पहाटे साडेपाचलाच हॉटेल सोडलं. आणि भिलार गावात पोहचलो.
स्ट्रॉबेरीच्या शेतकर्यांच्या संघटनेची स्थापना भिलार गावात झाल्याने हे गाव चर्चेत आलंय. इथला प्रत्येक शेतकरी स्ट्रॉबेरीच पीक घेतो. त्याला जोड पीक म्हणून फरसबी किंवा गव्हाचं पीकही घेतलं जातं. महाबळेश्वरचा हा परिसर डोंगराळ आहे. त्यामुळे इथली शेती डोंगर माथ्यावर केली जाते. त्यामुळे इथं प्रामुख्यानं पावसाचं जमिनीत मुरलेलं पाणीच शेतीला वापरलं जातं. विहिरीच पाणी, बोअरवेल हे पाण्याचे स्त्रोत.
पण आता महाबळेश्वरमधल्या वाढत्या हॉटेलच्या प्रमाणामुळे पाण्याची चणचण इथल्या गावकर्यांनाही जाणवतेय. त्यामुळं बाढणार्या स्ट्रॉबेरीच्या शेतीला पाणी पुरवणं कठीण होत चाललंय. यावर शेतकरी उपाय शेाधण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांनी नुकतीच एका पाझर तलवाची बांधणी पूर्ण केलीय. ज्याची साठवणक्षमता 10 कोटी लीटर आहे.
या तलावमुळे गावाला आणि शेतीला मुबलक पाणी पुरवठा होऊ शकेल.
ज्यांना नेहमीचे महाबळेश्वर पाहून कंटाळा आला असेल त्यांनी या स्ट्रॉबेरी फेस्टिव्हलला जाऊन भिलार गाव पाहण्याची मजा लुटलीच पाहिजे. गावातील लोकांमध्ये कामाची जिद्द, चिकाटी आणि उत्तम टीमवर्क पाहायला मिळते. मी माझ्या रिपोर्टच्या निमित्ताने इथल्या शेतकर्यांशी बोलत असताना कळलं की स्ट्रॉबेरीच्या शेतात या सर्व शेतकर्यांचं कुटुंब दिवस रात्र काम करते. स्ट्रॉबेरीचा सिझन असो अथवा नसो. स्ट्रॉबेरीचे हार्डनिंग केलेले टीश्यू कल्चर आयात केल्यापासून काम सुरू होते.
परदेशातून आणलेल्या टीश्यू कल्चरवरच भारतात पीक घेतलं जातं. हे टीश्यू विमानाने एअरपोर्टवर उतरल्यावर त्याचे टेस्टींग केले जाते. आणि मग ते महाबळेश्वरला आणले जातात. या टीश्यू कल्चरची लागवड पावसाळ्यात वाईजवळच्या कमी पावसाच्या गावात केली जाते. इथे त्या एका रोपापासून तीन रोपं वाढवली जातात. आणि पावसाळा संपला की महाबळेश्वरमधल्या गावात लावली जातात. मध्यंतरी कॅलिफोर्नियातून हे टीश्यू कल्चर भारतात पाठवणार्या शास्त्रज्ञांचा एक ग्रुप इथं भेट देऊन गेला. ते एका रोपापासून तीन रोपं तयार करण्याच्या शेतकर्यांच्या युक्तीने चकीत झाले. आणि त्यांनी या वर्षीपासून या टीश्यू कल्चरच्या रॉयल्टीचा डिमांड इम्पोर्ट कंपनीकडेच ठेवला! सध्या या गोष्टींवर उपाय शोधण्याच्या प्रयत्नात इथली शेतकरी संघटना आहे.
थंडीत स्ट्रॉबेरीची रोपं वाढायला लागल्यावर स्ट्रॉबेरीच्या पिकाची सुरुवात होते. इथल्या शेतकर्याच्या घरातील सर्वांच्या दिवसाची सुरुवात ही भल्या पहाटे होते घरातील सर्वचजण शेतात स्ट्रॉबेरी खुडायला जातात. इथं बाहेरचे कामगार फार कमी प्रमाणात कामासाठी ठेवले जातात. कारण एकच. स्ट्रॉबेरी हे अतिशय नाजूक असलेलं फळ कमीत कमी हाताळलं जावं आणि ग्राहकांपर्यंत आहे, तसं डस्ट फ्री पोहचावं.
गावातील गणपत पार्थे सारखे काही शेतकरी स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी परदेशी जाऊन आलेत. इस्त्राईलला स्ट्रॉबेरीची शेती कशी करायची याचं त्यांनी प्रशिक्षण घेतलं. मग इथं येऊन त्यांनी त्याबाबत शेतकर्यांना माहिती दिली. प्रायोगिक तत्वावर त्यांनी स्वत: शेती सुरू केली. सुरुवातीलाच त्यानी एकरी आठ टनाचं उत्पन्न घेतलं. हे गावातील इतर शेतकर्यांनी पाहिलं आणि त्यांनीही पार्थे यांच्याप्रमाणे शेतीला सुरुवात केली. यामुळे स्ट्रॉबारीच्या क्रांतीला सुरुवात झाली आणि स्ट्रॉबेरीचं उत्पन्न एकरी 8 टनानं वाढलं. उत्पन्न वाढलं पण त्यासोबतच चांगल्या प्रतीचं उत्पन्न घेण्याची जबाबदारीही वाढली. मग शेतकरी स्वत:च संशोधक झाले. पिकांसोबत रोगराईही आलीच. तिच्यावर अनुभवातून शेतकरी किटकनाशकं मारण्यास शिकले.आता इथली सर्व शेती ही ऑरगॅनिक पध्दतीने केली जाते. स्ट्रॉबेरीवर जंतूनाशकांचा प्रभाव राहू नये म्हणून...
स्ट्रॉबेरीच्या शेतीवर संशोधन व्हावं किंवा सरकारने आम्हाला प्रशिक्षणासाठी परदेशी पाठवावं, अशी इथल्या शेतकर्यांची मागणी आहे. तसेच आपल्याकडे फॅमिली शेतीचा विचार रुजावा आणि शेताचे तुकडे वाढणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. त्यातून शेती उत्पन्न वाढेल आणि शेतकरी समृध्द होईल, असा या गावच्या शेतकर्यांचे मत आहे.
स्ट्रॉबेरी फेस्टिव्हलच्या निमित्ताने या आडवाटेवरच्या महबळेश्वरला भेट देता आली. आणि तेथील जिद्दी शेतकर्यांना भेटता आलं.
Posted by sandeep raje
सारकारी पैशाने परदेशी जाणार मग रुपये कमावणार आणि ग्राहकांची वाजवणार. आता तरी कर बसवा शेतकर्यांवर खूप रडगान ज़ले भरपूर रुपये कमवून बाया नाचवतात, दारू पितात आणि शहरी लोकणा शिव्या घालतात कर कोण भरतो ? चांगला माळ प्रथम परदेशी पाठवतात. इथे पाउडर मारलेला माळ विकतात ***** . बंगले उतविले ह्यानी आणि आम्ही नोकरीत पिंजून आधी सारकारी खिसे भरतो




